Advertisement

ऊर्जा कपमध्ये मुंबई डीएफए संघाचा विजय


ऊर्जा कपमध्ये मुंबई डीएफए संघाचा विजय
SHARES

चेंबूरमध्ये आरसीएफएल मैदानावर झालेल्या फुटबॉल स्पर्धेत मुंबई डीएफएने स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया(SGFI) ला धूळ चारत अंडर-19 ऊर्जा कपवर आपले नाव कोरले. सोमवारी झालेल्या सामन्यात 3-2 अशा फरकाने मुंबई डीएफएने विजय मिळवला. मुंबई डीएफए संघाच्या कॅरेन पेस हिने दोन वेळा गोल करुन 2-0 ने आपल्या संघास आघाडीवर आणले. पण स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या मुलींनी देखील चांगली लढत दिली. त्यातील श्रृती लक्ष्मी आणि ममता आचार्य या दोघींनी प्रत्येकी एक गोल केला आणि सामना अनिर्णित झाला. तसेच शेवटच्या मिनिटाला कॅरेनने तिसरा गोल करून मुंबई संघाला विजेतपद पटकावून देत ऊर्जा कपवर आपलं नाव कोरलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा