Advertisement

मुंबईचा दिनेश कांबळी 'महाराष्ट्र श्री' किताबाचा मानकरी


मुंबईचा दिनेश कांबळी 'महाराष्ट्र श्री' किताबाचा मानकरी
SHARES

महाराष्ट्र बाॅडीबिल्डर्स असोसिएशनतर्फे कोपरगाव येथे अायोजित करण्यात अालेल्या महाराष्ट्र श्री २०१८ शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या दिनेश कांबळीने महाराष्ट्र श्री किताबावर नाव कोरले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांमधील तब्बल २७२ खेळाडूंनी भाग घेतला होता. एकूण १० वजनी गटात रंगलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटात चुरस पाहायला मिळाली. ६५ किलो वजनी गटातून गटविजेत्या झालेल्या दिनेश कांबळीने दुर्गाप्रसाद दासरी, विशाल सावंत यांचे अाव्हान मोडीत काढत विजेतेपदाला गवसणी घातली. 


मुब्बा शेख ठरली मिस महाराष्ट्र

महिलांच्या गटात ठाण्याच्या मुब्बा शेरा शेख हिने मिस महाराष्ट्र होण्याचा मान पटकावला. पुरुषांमध्ये बेस्ट पोझरचा किताब कोल्हापूरच्या दुर्गाप्रसाद दासरी याने मिळवला तर सर्वोत्तम प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटू म्हणून मुंबईच्या हरमित सिंगला गौरवण्यात अाले.


हे ठरले गटविजेते

५५ किलो वजनी गटात पालघरच्या नितीन बेहेरीकरने बाजी मारली. त्यानंतर ६० किलो वजनी गटात सांगलीचा मोहम्मद बेपारी विजेता ठरला. ६५ किलो वजनी गटात दिनेश कांबळीने निर्विवाद वर्चस्व गाजविले. ७० किलो वजनी गटात पालघरच्या शिवअासरे त्रिपाठीने तर ७५ किलो वजनी गटात मुंबईच्या विशाल सावंतने अव्वल क्रमांक पटकावला. ८० किलो गटात कोल्हापूरच्या दुर्गाप्रसाद दासरीने हुकूमत गाजवली. ८५ किलो गटात कोल्हापूरचा दिग्विजय घोडके तर ८५ किलोवरील गटात मुंबईचा हरमित सिंग विजेता ठरला.


पालघरला सांघिक विजेतेपद

या स्पर्धेत दिनेश कांबळी विजेता ठरला तरी मुंबईला सांघिक विजेतेपदापासून दूर राहावे लागले. सर्वोत्तम पदके पटकावणाऱ्या पालघर संघाने सांघिक विजेतेपदाचे पारितोषिक पटकावले. मुंबई संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.


हेही वाचा -

रामनिवासची 'भारत श्री'ला गवसणी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा