Advertisement

रामनिवासची 'भारत श्री'ला गवसणी


रामनिवासची 'भारत श्री'ला गवसणी
SHARES

तब्बल नऊ तास रंगलेल्या भारत श्री स्पर्धेत मुंबईचा सुनीत कुमार हॅटट्रिक लगावणार की रामनिवासच्या रूपानं नवा मिस्टर इंडिया देशाला मिळणार, हा एकच प्रश्न सर्वांना पडला होता. दोन-दोन वेळा कंपेरिजन केल्यानंतरही जजेसना हा पेच सोडवता येत नव्हता. अखेर सुनीत जाधवचं भारत श्रीच्या हॅटट्रिकचं स्वप्न मोडीत काढत रामनिवासनं ११व्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान पटकावला. रोहितला उपविजेतेपद तर दिल्लीच्या नरेंदर यादवला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. दहापैकी पाच गटात सोनेरी कामगिरी करणारा रेल्वे सांघिक विजेतेपदाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राला पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.


उत्कंठा, थरार अाणि निराशा...

बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात ५८४ खेळाडूंच्या उपस्थितीनं भारत श्रीचा समारोप हृदयाचे ठोके चुकवणारा ठरला. चॅम्पियन ऑफ चॅम्पियनच्या गटात सुनीतसमोर रामनिवास आणि अनुज कुमारचं कडवे आव्हान होतं. मात्र पहिल्या कंपेरिजनमध्ये अनुज मागे पडला. सुनीत अाणि रामनिवास तोडीस तोड असल्यामुळे जजेसनी दोघांची कंपेरिजन केली. यात दोघांचेही समान गुण झाले. अखेर पंचांनी तिसऱ्या कंपेरिजनमध्ये रामनिवासच्या पारड्यात मत टाकलं अाणि सुनीतचं हॅटट्रिकचं स्वप्न अधुरं ठरलं. त्यामुळे स्टेडियममध्ये निराशा पसरली.


रामनिवासची ९ लाखांची कमाई

क्रीडाप्रेमी अनिकेत तटकरे यांनी भारत श्री विजेत्या खेळाडूला रोख ५१ हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली होती. गटविजेत्याचे एक लाख जिंकणाऱ्या रामनिवासने भारत श्री किताब जिंकून साडे सात लाख रुपयांचे रोख इनामही मिळवले. त्याचबरोबर तटकरेंनी जाहीर केलेल्या ५१ हजारांसह त्याने एकूण नऊ लाख रुपयांची कमाई केली.


गटविजेते कोण?

55 किलो वजनी गटात जे. जे. चक्रवर्तीने निर्विवाद यश मिळवले. ६० किलो वजनी गटात भाईंदरच्या नितीन म्हात्रेने प्रथम क्रमांक पटकावला. ६५, ७० अाणि ७५ किलो गटात एस. भास्करन, अनास हुसेन आणि व्ही. जयप्रकाशने हुकूमत गाजवली. ८० किलो गटात मुंबईच्या सागर कातुर्डेने बाजी मारली. ८५ किलो गटात दिल्लीचा नरेंदर यादवने अव्वल स्थान पटकावले. सुनीत जाधवच्या ९० किलो वजनी गटात कुणाचाच निभाव लगला नाही.महेंद्र चव्हाणने दुसरा तर रिजू पॉल जोसने तिसरं स्थान मिळवलं. स्पर्धेतील सर्वात तगड्या गटात राम निवासनं महेंद्र पगडेला मागे टाकत सोनेरी यश संपादले.


हेही वाचा -

मिस्टर इंडियाची हॅटट्रिक लगावणारच, सुनीत जाधवला विश्वास

'भारत श्री' विजेत्यांना मिळणार ५० लाखांची बक्षिसं

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा