राज्य वॉटर पोलो स्पर्धेत मुंबईच्या महिलांची बाजी

  Mumbai
  राज्य वॉटर पोलो स्पर्धेत मुंबईच्या महिलांची बाजी
  मुंबई  -  

  महाराष्ट्र राज्य वॉटर पोलो लीगमध्ये मुंबईच्या मुलींनी जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं, तर महिमा मोझेस हिने सुवर्णपदक पटकावले. पुण्याच्या बालेवाडी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथे गुरुवारी ही स्पर्धा आयोजित केली होती.

  मुंबई संघाच्या नेतृत्वाखाली महिमाने पहिल्यांदा रायगडला 6-4 अशी लढत दिली. त्यानंतर पुणे संघाला 5-2 अशा फरकाने पराभूत केले आणि अमरावती विरुद्ध झालेल्या सामन्यात 6-5 असा विजय मिळवला. या स्पर्धेत महिला गटात महिमा ही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. तिने केलेल्या एकूण 11 गोलमुळे संघाला अंतिम सामन्यात विजय मिळवता आला.

  पुरुष गटात रायगड संघाने सुवर्णपदकाची कमाई केली. रायगडने पुणे संघासोबत 17-2 अशा गुणसंख्येने विजय मिळवला तर, मुंबई 15-2 आणि अमरावतीसोबत 13-1 असा विजय मिळवत स्पर्धेत रायगडने आपली धमक दाखवली. पुरुष गटात पीयूष सुर्यवंशी हा उत्कृष्ट गोलकीपर ठरला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.