आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सची चांदी

 Mumbai
आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सची चांदी
Mumbai  -  

मुंबई - आयपीएलच्या 10 व्या पर्वात काही खेळाडूंचं नशीब उजळलं तर काहींना चांगलाच धक्का बसलाय. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन टोक्स हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर भारतीय खेळाडूंमध्ये कर्ण शर्मा हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने या खेळाडूला 3.2 कोटी रुपयाला खरेदी केलं. कर्नाटक संघातून खेळणारा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौथमसाठी हा लिलाव फायदेशीर ठरला. मुंबई इंडियन्सने गौथमला दोन कोटीत खरेदी केलं. त्याची किमान किंमत 10 लाख होती. गौतम हा एक आक्रमक फलंदाज आहे. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राइक रेट 166.66 चा आहे. तर रोहित शर्मा, हरभजन सिंग, रायुडू, हार्दिक पंड्या, पार्थिव पटेलसह पोलार्ड, लेंडल सिमन्स, लसिथ मलिंगा आणि मिशेल जॉन्सन यांचीही मुंबई इंडियन्ससाठी खरेदी करण्यात आली आहे.

मुंबई इंडियन्सचे खेळाड़ू

मिशेल जॉन्सन - दोन कोटी रुपये

के. गौतम - दोन कोटी रुपये

कर्ण शर्मा - तीन कोटी 20 लाख रुपये

सौरभ तिवारी - 30 लाख रुपये

असेला गुणरत्ने - 30 लाख रुपये

कुलवंत खेजरोलिया - 10 लाख रुपये

निकोलस पुरण - 30 लाख रुपये

Loading Comments