मुंबई धावणार...

Churchgate
मुंबई धावणार...
मुंबई धावणार...
मुंबई धावणार...
मुंबई धावणार...
See all
मुंबई  -  

मुंबई - संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या मुंबई मॅरेथॉनचा काऊंट डाऊन सुरु झाला आहे. अवघ्या काही तासांतच सुरु होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी सर्व सज्ज झाले आहेत. रविवारी मॅरेथॉनच्या मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विविध ठिकाणी आरोग्य केंद्रांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. वेग मुंबईकरांच्या जणू नसानसांत भिनला आहे. मॅरेथॉनमधल्या सहभागाचा गाभा हा जिंकणं किंवा हरण्याशी निगडीत नाही तर साऱ्या समाजाला एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न यात आहे. नामवंत अॅथलिट्सचा सहभाग हा मॅरेथॉनला वजन आणणारा आहेच, पण त्या अॅथलिट्सच्या खांद्याला खांदा भिडवून एखादा सर्वसामान्य नागरिकही शर्यतीत सहभागी होऊ शकतो, हेच मॅरेथॉनचं अप्रूप आहे.

आपण जिंकू शकणार नाही याची कल्पना असूनही केवळ धावण्याच्या आवडीसाठी मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारी बिनचेहऱ्यांची हजारो माणसं जगभरात आहेत. नामवंत अॅथलिट असो किंवा सर्वसामान्य माणूस, मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन शारीरिक आणि मानसिक कणखरतेच्या परीक्षेला सामोरं जाणं हेच प्रत्येकाचं उद्दीष्ट असतं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.