Advertisement

शिवाजी पार्क जिमखाना तर्फे रविवारी मॅरेथॉनचे आयोजन

फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी शिवाजी पार्क जिमखान तर्फे दरवर्षी मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. यावर्षी २० ऑगस्टला मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवाजी पार्क जिमखाना तर्फे रविवारी मॅरेथॉनचे आयोजन
SHARES

धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्य जपू पाहणाऱ्यांसाठी मॅरेथॉन एक पर्वणीच आहे. फक्त फिटनेसशी संबंधितच नाही तर सामाजिक संदेश देण्याचे एक माध्यम म्हणून मॅरेथॉन आयोजित केल्या जातात. 

मॅरेथॉन म्हणजे समाज म्हणून एकसंधपणे तंदुरुस्तीच्या दिशेने होणार प्रवास आहे. अशाच एका मॅरेथॉनचा भाग होण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. 

शिवाजी पार्क जिमखाना, दादरने रविवार 20 ऑगस्ट रोजी मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. सर्व वयोगटातील स्पर्धांसाठी ही स्पर्धा खुली असणार आहे. 

५ किलोमीटर फन रन स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेतून स्पर्धकांना आपला फिटनेस जोखण्याची संधी मिळणार आहे. 

एसपीजी मॅरेथॉन ही फक्त स्पर्धा नाही तर एकतेचे प्रतिक आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणे म्हणजे एकत्र येऊन एकप्रकारे आपल्या निरोगी आयुष्याच्या दिशेने हे पुढचे पाऊलच आहे. 

एसपीजी मॅरेथॉन स्पर्धा खरंतर एक उत्सव आहे. फक्त मॅरेथॉनच नाही तर लाईव्ह पर्फोमर्स, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि फिटनेसशी संबंधित उत्पादनांची माहिती देणारे विविध स्टॉल्स इथे असतील.

कार्यक्रमातून मिळालेल्या रकमेचा एक फिटनेसशी संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देणाऱ्या संस्थेला दान केला जाईल. सहभागी होऊन, तुम्ही या उपक्रमाचा भाग व्हा, असे आवाहन SPG तर्फे करण्यात आले आहे.

मॅरेथॉनबाबत सर्व माहिती

तारीख: 20 ऑगस्ट 2023

स्थळ: शिवाजी पार्क जिमखाना, दादर

वेळ: सकाळी ६:०० वाजता

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा