कॅरम स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंची अंतिम फेरीत धडक


  • कॅरम स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंची अंतिम फेरीत धडक
SHARE

राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत आगेकूच केली आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा, युवक संचालनालय आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात मुंबईच्या गत विजेती श्रृती सोनावणेने कोल्हापूरच्या आकांक्षा कमदचा ०-२३ असा पराभव करत पहिला सेट जिंकून आघाडी घेतली. नंतरच्या दोन्ही सेटमध्ये श्रृतीने आकांक्षाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

धारावीच्या राजीव गांधी क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत बिगरमानांकित २ लढतीत मुंबईच्या अमूल्या राजुलाने प्रतिस्पर्धी कोल्हापूरच्या प्रणाली अहिरेला १७-९, १७-० अशा गुणसंख्येने पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.याचदरम्यान झालेल्या १४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात मुंबईच्या अर्पण बांदिवडेकरने प्रतिस्पर्धी असलेला मुंबईच्या ओजस जाधव याला तिन्ही सेटमध्ये २१-१०, १-११, २५-५ अशा फरकाने पराभूत करत उपांत्य फेरीत विजय मिळवला.


संबंधित विषय
ताज्या बातम्या