• भारतीय क्रीडा मंदिरात रंगली लेझीम स्पर्धा
  • भारतीय क्रीडा मंदिरात रंगली लेझीम स्पर्धा
  • भारतीय क्रीडा मंदिरात रंगली लेझीम स्पर्धा
  • भारतीय क्रीडा मंदिरात रंगली लेझीम स्पर्धा
  • भारतीय क्रीडा मंदिरात रंगली लेझीम स्पर्धा
SHARE

वडाळा - मुंबई शारिरीक शिक्षण मंडळाच्यावतीनं कै. दत्ताराम लाड चषक शालेय लेझीम स्पर्धा भारतीय क्रीडा मंदिरात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन धारावी येथील शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विना दोलवलकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लिलाधर चव्हाण, मुंबई शारिरीक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय शेटे, प्राचार्य डॉ. गो.वि.पारगांवकर, स्पर्धाप्रमुख डॉ. रोहिणी कवडे उपस्थित होत्या.

या स्पर्धेत 11 शाळांतील सुमारे 1 हजार शालेय मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. प्रत्येक गटातील स्पर्धकांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडेल अशी वेगवेगळी वेशभूषा करून लेझीद्वारे विविध सामाजिक संदेश दिले. झाडे लावा झाडे जगवा, आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि निरोगी जीवन जगा, कचरा कचराकुंडीतच टाका असे जनजागृतीपर संदेश लेझीमच्या माध्यमातून देण्यात आले. मनोरंजनात्मक पद्धतीनं पार पडलेल्या या लेझीम स्पर्धेत डोंबिवली येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळेनं प्रथम क्रमांक पटकावून कै. दत्ताराम लाड चषक, स्मृतीचिन्ह आणि पाच हजार रुपयांचे बक्षीस मिळवले. तर काळाचौकी शिवाजी शिक्षणोत्तेजक मंडळ या शाळेनं द्वितीय क्रमांक पटकावून स्मृतिचिन्ह आणि तीन हजार रुपये आणि कल्याण एन.आर.सी.स्कूल या शाळेनं तृतीय क्रमांक पटकावून दोन हजार आणि स्मृतीचिन्ह पटकावले. तर परळ सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल या शाळेनं चतुर्थ क्रमांकाचे उत्तेजनार्थ स्मृतिचिन्ह मिळवले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या