मुंबईची सावध सुरुवात

  New Delhi
  मुंबईची सावध सुरुवात
  मुंबई  -  

  नवी दिल्ली - आजपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू झालेल्या सराव सामन्यात मुंबईने सावध सुरुवात केली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने पहिला डाव 7 बाद 324 धावांवर घोषित केल्यानंतर मुंबईने पहिल्या दिवसअखेर एक बाद 29 धावा केल्या आहेत.

   फिरोझशाह कोटला स्टेडियमवर सुरू झालेल्या या लढतीत मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मुंबईकर गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. मात्र टॉम लॅथहॅम (55), केन विल्यम्सन (50), रॉस टेलर (41) आणि मिचेल सेंटनर (45) यांनी झटपट धावा जमवल्या आणि पाहुण्या संघाला तीनशेपार मजल मारून दिली. अखेर न्यूझीलंडने आपला पहिला डाव 7 बाद 324 धावांवर घोषित केला. मुंबईकडून बलविंदर सिंग संधूने दोन बळी टिपले. तर विशाल दाभोळकर, विजय गोहिल व सिद्धेश लाड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
  त्यानंतर मुंबईच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. ट्रेंट बोल्टने जय बिश्टला (0) पहिल्याच षटकात माघारी धाडले. पुढे कौस्तुभ पवार (खेळत आहे 5) आणि अरमान जाफर (खेळत आहे 24) यांनी मुंबईला पहिल्या दिवसअखेर एक बाद 29 धावापर्यंत मजल मारून दिली.

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.