'वल्लव रे नाकवा वल्लव वल्लव'

 Mumbai
'वल्लव रे नाकवा वल्लव वल्लव'

मुंबई - प्रोकॅम इंटरनॅशनलने 5 मार्चला म्हणजेच रविवारी पॉवर बोटींग स्पर्धेचे आयोजन केले आहे. पॉवर बोटिंग स्पर्धेसोबतच तुम्हाला आणखी एका स्पर्धेचा थरार अनुभवता येणार आहे. कोळी बांधवांची देखील रेसिंग आयोजित करण्यात आल्या आहेत. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या कार्यक्रमात कोळी बांधव आपल्या नेहमीच्या होड्या घेउन सहभागी होणार आहेत. तसेच मुंबईतील उत्तन, वर्सोवा, माहिम, वरळी, कुलाबा, कफ परेड, गिरगाव या कोळी वाड्यातून प्रत्येकी 5 होड्या असणार आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकास एक लाख, दुस-या क्रमांकास साठ हजार तर तिसऱ्यास चाळीस हजार असे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. 2000 मीटरची ही रेस 40 मिनिटांत पूर्ण करायची आहे. त्यासेबतच या कार्यक्रमात कोळी बांधवांसाठी बोट सजावटीची देखील स्पर्धा ठेवण्यता आली आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकास पंचवीस हजार, दुसऱ्या क्रमांकास पंधरा हजार तर तिसऱ्या क्रमांकास दहा हजार असे पारितोषिक ठेवण्यता आले आहे.

चर्नीरोड चौपाटी येथे 5 मार्चपासून पॉवर बोटींग स्पर्धा सुरू होणार आहे. सी एस संतोष  हे या स्पर्धेत भारताचे प्रतीनिधित्व करणार आहेत.


युएस, युके अशा देशातून येणाऱ्या स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. भारतात पहिल्यांदाचा  होणाऱ्या या स्पर्धेसाठी मुंबईकरांची उत्सुकता लागलेली आहे.


Loading Comments