पाच तासात 21 किलोमीटरचा समुद्री प्रवास

Mumbai
पाच तासात 21 किलोमीटरचा समुद्री प्रवास
पाच तासात 21 किलोमीटरचा समुद्री प्रवास
पाच तासात 21 किलोमीटरचा समुद्री प्रवास
See all
मुंबई  -  

जिद्दीच्या जोरावर 11 वर्षाच्या मुंबईकर जाई जिंगने समुद्रातील 21 किलोमीटर पोहण्याचे अंतर अवघ्या 5 तास 2 सेकंदात पूर्ण करून सर्वांना चकित केले. पण लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची तिची संधी थोडक्यात हुकली.  

खवळत्या समुद्राच्या लाटांना मात देणारी जलतरणपटू जाई जिंग अवघ्या 11 वर्षांची आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याचे तिचे स्वप्न आहे. ती सहावीच्या वर्गात शिकत आहे. ती गेल्या तीन वर्षांपासून समुद्रातील लांब पल्ल्याच्या स्पर्धेसाठी सराव करत आहे. त्यासाठी प्रशिक्षकही नेमण्यात आले आहेत.


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.