मुंबईकर गार्गी निघाली पॅरिसला, जागतिक रग्बी स्पर्धेत निवड


SHARE

जागतिक रग्बी स्पर्धेसाठी मुंबईच्या मुलुंड येथे राहणाऱ्या गार्गी वलेकरची दुसऱ्यांदा भारतीय संघात निवड झाली आहे. सेंट मेरी शाळेत शिकत असताना रग्बी खेळासोबत तिची नाळ जुळली. सध्या ती रुपारेल महाविद्यात एफ.वाय.बी.एचे शिक्षण घेत आहे. भारतीय 18 वर्ष वयोगटातील मुलींचा संघ पॅरिस येथे होणाऱ्या जागतिक रग्बी 2017 स्पर्धेत सहभागी होणार आहे. ही स्पर्धा येत्या 7 आणि 8 जुलै रोजी होणार आहे. ओडीशाच्या सुमित्रा नायक हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. भारतीय संघासाठी ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. या आधी 18 वर्ष वयोगटातील संघाने युएईमध्ये झालेल्या 'आशियाई अंडर-18 रग्बी सेवेन्स चॅम्पियनशीप' मध्ये कांस्य पदक मिळवले होते, अशी माहिती संघाचे प्रशिक्षक नासीर हुसेन यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

त्यांनी चैन शिबीरचे आयोजन केले होते. यात एकूण 25 मुली होत्या. त्यातून 12 मुलींची चैन तयार केली आहे. यात ओडिशा-पश्चिम बंगालमधील पाच-पाच मुली आहेत. तर दोन मुली या दिल्ली आणि मुंबईतील आहेत. सुमित्रा, रजनी साबर, बासंती पंगी, लिजा सरदार या ओडीशाच्या आहेत. तर गार्गी वालेकर ही महाराष्ट्राची असून या युएईमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत देखील सहभागी होती. यावेळचा भारतीय संघ खुपच मजबूत आहे. 6 जुलैला पॅरिस येथे जाण्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती हुसेन यांनी दिली.

विजयाचे पदक मिळवण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून मुंबईत सराव करत आहोत, अशी माहिती कर्णधार सुमित्रा नायकने दिली. ही स्पर्धा जिंकण्यासाठी परिश्रम करत असल्याचेही तिने सांगितले.

जागतिक स्पर्धेत रग्बीच्या व्यतिरिक्त व्हॉलीबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल आणि हॅंडलबॉल यांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 60 देशांतून एकूण 15000 स्पर्धक सहभागी होणार आहे.


आखलेल्या योजनेनुसार खेळलो तर आम्ही नक्कीच पदक मिळवू. या स्पर्धेत युरोपियन आणि अमेरिकन संघाकडून आम्हाला कडवी लढत मिळेल. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची ही माझी दुसरी वेळ आहे. पण थोडे दडपण आहेच. या स्पर्धेसाठी आम्ही परिश्रम केले आहेत. त्यामुळे आम्ही नक्कीच विजय मिळवू.

- गार्गी वालेकर


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या