बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त क्रिकेट सामन्यांचं आयोजन

wadala
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त क्रिकेट सामन्यांचं आयोजन
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त क्रिकेट सामन्यांचं आयोजन
See all
मुंबई  -  

माटुंगा - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवशाही मित्र मंडळाच्या वतीने प्रकाश झोतातील क्रिकेट सामने आयोजित केले होते. शिवशाही मित्र मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र शिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट सामान्यांमध्ये अनेक संघ सहभागी झाले होते. माटुंग्याच्या नपु गार्डनमध्ये हे क्रिकेट सामने भरवण्यात आलं होते. 18 ते 21 जानेवारी दरम्यान पार पडलेल्या या सामान्यांमध्ये प्रथम पारितोषिक नवहंस मित्र मंडळ यांनी पटकावलं. त्यांना शिवशाही मित्र मंडळाच्या वतीनं 6,666 रुपये आणि चषक असं बक्षिस देण्यात आलं. तर उपविजेता ठरलेल्या माटुंग्याच्या विश्वविनायक मित्र मंडळाला 4,444 रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.