ओजास्विता ऊर्जापेयाचं उद्घाटन

  Fort
  ओजास्विता ऊर्जापेयाचं उद्घाटन
  मुंबई  -  

  सीएसटी - आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्री आयुर्वेदा उपक्रमाच्या ओजास्विता या ऊर्जापेयाचं अनावरण करण्यात आलं. बॅडमिंटनपटू सिंधू आणि राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांच्या हस्ते मुंबई प्रेस क्लब येथे अनावरण करण्यात आलं.

  'आरोग्याला घातक अशा पेयांचा प्रचार करणार नसल्याचं ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने या अनावरण कार्यक्रमात म्हटलं. ऑलिम्पिक पदकानंतर विविध स्तरांतून जाहिराती आणि विविध उत्पादनांचं सदिच्छादूत होण्यासाठी असंख्य प्रस्ताव आहेत. मात्र लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल अशा उत्पादनाच्या जाहिराती टाळल्याचंही सिंधूने सांगितले'. तर बॅडमिंटन विश्वातील प्रतिष्ठेची ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकल्यानंतर माझ्यासमोरही शीतपेय उत्पादक कंपन्यांनी प्रस्ताव समोर ठेवले होते. ज्या गोष्टी आरोग्याला हानिकारक आहेत, ज्यांचं सेवन मी स्वतः करत नाही, अशा गोष्टींचा प्रचार करण्याचं टाळत असल्याचे गोपीचंद यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.