फुटबॉल स्पर्धेत सेंच्युरी रायनने युनियन बँक ऑफ इंडियाला हरवले

 Chembur RCF Ground
फुटबॉल स्पर्धेत सेंच्युरी रायनने युनियन बँक ऑफ इंडियाला हरवले
Chembur RCF Ground, Mumbai  -  

चेंबूर - मुंबई एलिट चॅम्पियन्स असलेल्या तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) ने शानदार खेळाचं प्रदर्शन करत फुटबॉल मॅचमध्ये देना बॅंकेला 2-0 ने हरवलं. तर दुसऱ्या मॅचमध्ये सेंच्युरी रायनने युनियन बँक ऑफ इंडियाला 2-1 ने हरवलं. शॉपम हा खेळाचा सलामीवीर स्पर्धक होता. नाडकर्णी कप फुटबॉल स्पर्धा मुंबईत सर्वात जुनी टूर्नामेंट आहे. या वर्षी एमडीएफए लीगच्या 16 संघांनी नाडकर्णी कप फुटबॉल टूर्नामेंटमध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेत ओएनजीसी, एयर इंडिया, पश्चिम रेल्वे, मुंबई सीमा शुल्क विभाग, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, यूनियन बॅंक ऑफ इंडिया, कर्नाटक एसए, पीआयएफए कुलाबा, भारतीय रिझर्व्ह बॅंक, एचडीएफसी, सेंच्युरी रायन, देना बॅंक, सेंट्रल रेल्वे, मुंबई एफसी अंडर -19 आणि जीएम स्पोर्ट्स क्लब असे अनेक संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.

Loading Comments