SHARE

टेनिसपटू व संघटक पी. एस. उर्फ दादा खानोलकर स्मृती एसपीजी टेनिस स्पर्धा २७ मे रोजी दादर येथील शिवाजी पार्क जिमखान्यावर रंगणार आहे. टेनिस मार्कर अाणि सहाय्यक प्रशिक्षक हे दोन्ही घटक स्पर्धेपासून वंचित राहत असल्यामुळे शिवाजी पार्क जिमखान्याने गेल्या वर्षीपासून त्यांच्यासाठीही स्पर्धा सुरू केली. दुहेरी गटात ही स्पर्धा खेळविण्यात येणार असल्यामुळे मोठ्या संख्येने दुहेरीचे स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतील, अशी अाशा अाहे.


या गटात होईल स्पर्धा

टेनिस मार्कर व सहाय्यक प्रशिक्षक यांच्यासाठी मर्यादित असलेली ही दुहेरी टेनिस स्पर्धा महिला जोडी, पुरुष जोडी अथवा मिश्र जोडी या गटात खेळविण्यात येईल. अाठ विजेत्यांना पुरस्कार देण्यात येणार असून अंतिम विजेत्यास बारा हजार रुपये व दादा खानोलकर स्मृती चषक तर उपविजेत्यास दहा हजार रुपये देऊन गौरवण्यात येणार अाहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित खेळाडूंनी अधिक माहितीसाठी संजय पटेल (९८२०२ ४१३५१) अथवा रामू (९०२९२ ५२४५६), शिवाजी पार्क जिमखाना, दादर-पश्चिम, मुंबई-४०० ०२८ येथे १९ मेपर्यंत संपर्क साधावा.


हेही वाचा -

शिवाजी पार्क जिमखान्यावर मुख्यमंत्र्यांची बॅटिंग...

संबंधित विषय
ताज्या बातम्या