बिलियर्ड स्पर्धेत पार्क क्लबचा विजय

  Mumbai
  बिलियर्ड स्पर्धेत पार्क क्लबचा विजय
  मुंबई  -  

  बीएसएएम चेंबूर जिमखाना बिलियर्ड लीगच्या उप-उपांत्य फेरीत अमित सप्रु याने उत्कृष्ट कामगिरी केली. पार्क क्लबच्या बीच बॉईज विरूद्ध बॉम्बे जिमखानाच्या फॉटम्स यांच्यात हा सामना रंगला होता. यामध्ये फॉटम्सचा 668-622 अशा फरकाने पराभव करत बीच बॉयने विजय मिळवला. ही स्पर्धा शुक्रवारी चेंबूर जिमखाना येथील बिलियर्ड हॉलमध्ये झाली. 


  बाजूच्या टेबलावर केजी फोर अँड हाफ मेन (खार जिमखाना) संघाचा कर्णधार रिषभ ठक्कर आणि 13 वर्षीय सुमेर मागो या दोघांनी रेडिओ स्टार्ट्सअप (बीपी रेडिओ क्लब)ला 588-512 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला.


  यादरम्यान केजी फोर आणि हाफ मेन ( खार जिमखाना) विरुद्ध रेडिओ स्टार्ट्सअप (बी पी रेडिओ क्लब) यांच्यातील सामने देखील रंगतदार ठरले. खार जिमखान्याच्या स्पर्श फेरवानी, रिषभ ठक्कर आणि सुमेहर मोगो या तिघांनी रेडिओ क्लबच्या स्पर्धकांना पराभूत करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला.


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.