पाय्याडे आणि पारसी उपांत्य फेरीत

 Mumbai
पाय्याडे आणि पारसी उपांत्य फेरीत
Mumbai  -  

इस्लाम जिमखाना आयोजित सलार जंग टी 20 टूर्नामेंटमध्ये उपउपांत्य फेरीत पाय्याडे स्पोर्टस् क्लब आणि पारसी जिमखाना यांनी विजय नोंदवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत पाय्याडे विरुद्ध सुविनीयर स्पोर्टस् क्लब आणि पारसी जिमखाना विरुद्ध इस्लाम जिमखाना असे सामने रंगणार आहेत.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात पय्याडे संघाने सिंध स्पोर्टस् क्लबला 97 धावांमध्ये गारद केले. यात रॉयस्टन डायस आणि विशाल दाभोलकर या दोघांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर पाय्याडे ने 7.4 षटकांत सामना खिशात घातला. ओपनर अखिल हरेवाडकर याने अर्धशतकी खेळी केली. तर एकनाथ केरकर याने 41 धावा करत विजयात महत्त्वाचा उचलला. अखिल हेरवाडकर याने 9 चौकार आणि 2 षटकार लगावले तर एकनाथ याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले.

Loading Comments