प्रबोधन टी20 क्रिकेट स्पर्धेत पय्याडे, एमआयजी उपांत्य फेरीत

Goregaon
प्रबोधन टी20 क्रिकेट स्पर्धेत पय्याडे, एमआयजी उपांत्य फेरीत
प्रबोधन टी20 क्रिकेट स्पर्धेत पय्याडे, एमआयजी उपांत्य फेरीत
See all
मुंबई  -  

गोरेगाव मधील प्रबोधन क्रीडांगणावर सुरू असलेल्या प्रबोधन टी 20 क्रिकेट स्पर्धेत साईराज याची ५७ धावाची शानदार खेळी तसेच दीपक शेट्टीचे 16 धावत 3 बळी यांच्या जोरावर पय्याडे स्पोर्ट्स संघाने नॅशनल संघावर ४० धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुस-्या सामन्यात गतविजेत्या प्रबोधन संघाचा 77 धावांनी पराभव करून एमआयजी संघाने उपांत्य फेरी गाठली. पय्याडे संघाने 20 षटकात 9 बाद 173 धावा केल्या. त्यात नील नार्वेकर 34 तर हरमित सिंघ 32 यांनी मोठे योगदाना दिले.

नॅशनल संघाचे फलंदाज विजय मिळवण्याचा प्रयत्नात अपयशी ठरले. नॅशनल संघाचा डाव 17.1 षटकात 133 धावांत गुंडाळून पय्या़डे संघास यश आले.  पय्याडेच्या दीपक शिंदेने 16 धावांत 3, तर सिदक सिंघ, रॉयस्टन डायस प्रत्येकी 2 गडी बाद करत नॅशनल संघाच्या फलंदाजांना तंबूत परत पाठवले.

एमआयजीच्या २१७ धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेला गतविजेता प्रबोधन संघ १६.२ षटकात १४० धावांवर गारद झाला. प्रबोधनच्या कुशल शहा (५३) आणि शोएब सिद्दिकी (४६) यांनी विजय मिळविण्याचा आटोकोट प्रयत्न केला. पण एमआयजीच्या गौरव जठारने अचूक मारा करत १६ धावांत निम्मा संघ तंबूत धाडला. त्याआधी केविन अल्मेडाच्या हाताला दुखापत झाल्याने त्याची शतक  करण्याची संधी हुकली. तो ९१ धावांवर बाद झाला. सामनावीर म्हणून गौरव जठरला गौरविण्यात आले.  पारशी जिमखाना विरुद्ध न्यू हिंदमध्ये झालेल्या सामन्यात पारशी संघाने ११ धावांनी विजय मिळवला. पारशी संघाने सर्वबाद २१९ धावा केल्या. तर न्यू हिंद संघाला २० षटकात ९ गडी गमावत २०८ धावा केल्या. पारशी संघाच्या रौनक शर्माने ८२ धावांची खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.