Advertisement

लॉकडाऊनच्या काळात 'हौजी'ला पसंती

या लॉकडाऊनच्या दिवसात नागरिकांनी करमणुकीसाठी महत्वाच्या खेळाची जागा या हौजीला दिली आहे.

लॉकडाऊनच्या काळात 'हौजी'ला पसंती
SHARES

आतापर्यंत मुंबई केवळ दंगल झाल्यानंतरच बंद झाली आहे. अनेकदा आपतकालिन परिस्थिती किंवा पावसाळ्यात जास्तीचा पाऊस पडल्यानं रस्त्यांवर पाणी साचल्यामुळं मुंबईतील काही भाग बंद करण्यात आले आहेत. मात्र, मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या व्हायरसमुळं मुंबई बंद झाली आहे. हा व्हायरस म्हणजे 'कोरोना'... याआधी मुंबईत दंगलीमुळं संचारबंदी लागू करण्यात येत होती. परंतु, आता कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबईसह राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमुळं (लॉकडाऊन) अनेक कंपन्या बंद करण्यात आल्या असून, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, नोकरवर्गाला २४ तास घरी राहण्याची सवय नसल्यांनी करमणुकीसाठी घरी लोक वेगवेगळ्या प्रकारे आपला वेळ घालवत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात घरी बसलेल्या लोकांना आता २१ दिवस २४ तास घरात घालवणं जड जात आहे. त्यामुळं घरातल्या लहान मुलांप्रमाणं मोठ्यांनीही कॅरम, लुडो, साप शिडी, हौजी, बॅडमिंटन इत्यादी खेळ खेळत आहेत. हे खेळ खेळून आपला वेळ घालवत आहेत. या खेळांपैकी हौजी खेळाला लोकांनी अधिक पसंती दिल्याचं चित्र आहे. बाजारात हौजी खेळाच्या पुस्तकांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

नेहमी दिवसातील १२ ते १४ तास घराबाहेर असल्यामुळं हौजी खेळाकडं कोण पाहतही नाही. परंतु, या लॉकडाऊनच्या दिवसात नागरिकांनी करमणुकीसाठी महत्वाच्या खेळाची जागा या हौजीला दिली आहे. त्यामुळं इमारत, चाळीत राहणारे रहिवाशी एकत्र येऊन गप्पा-गोष्टी करत या खेळाची मजा घेत आहेत. यामुळं काहींना आपलं लहानपणं आठवतं, तर काहींना आपल्या कुटुंबाला पुर्ण वेळ देता येतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायपसच्या वाढत्या संसर्गामुळं देशात २१ दिवस संचारबंदीची घोषणा केली. त्यावेळी सर्व बंद होईल, या भीतीनं सामान्यांनी किराणा सामान भरण्यासठी रांगा लावल्या. तसंच अनेकांनी २१ दिवस करमणुकीसाठीच्या योजना आखण्यास सुरूवात केली. यामध्ये हौजी खेळाला प्रमुख स्थान देण्यात आलं आहे.



हेही वाचा -

कर्जे होणार स्वस्त, आरबीआयकडून रेपो दरात कपात

कोरोनावर मात करण्यासाठी सरकारला शिवसेनेची साथ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा