Advertisement

कर्जे होणार स्वस्त, आरबीआयकडून रेपो दरात कपात

अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो दरात 0.75 टक्क्याची मोठी कपात केली आहे. यामुळे बँकांचं कर्ज स्वस्त होणार आहे.

कर्जे होणार स्वस्त, आरबीआयकडून रेपो दरात कपात
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो दरात 0.75 टक्क्याची मोठी कपात केली आहे. यामुळे बँकांचं कर्ज स्वस्त होणार आहे. गृह, वाहन यासह इतर कर्जांचा दर कमी होणार असून मासिक हप्त्याचा भार हलका होणार आहे.

 लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर आरबीआयच्या पतधोरण समितीने आठवडाभर आधीच बैठक घेतली. बैठकीतरेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात  करून तो ४.४० टक्के करण्यात केला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली. रिव्हर्स रेपो रेट ०.९० टक्के घटवून ४ टक्के केला आहे. कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्लाही बँकांना शक्तिकांत दास यांनी दिला आहे. असं झाल्यास सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

बाजारात रोकड उपलब्धता वाढवण्यासाठी एसएलआर दर ३ टक्के करण्यात आला आहे. यामुळे बँकांना १.७ लाख कोटींची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे. याशिवाय आणखी दोन उपाययोजनांमुळे येत्या ३० जून पर्यंत बाजारात ३.७४ लाख कोटीची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार असल्याचे आरबीआयने म्हटल आहे.

करोनाशी लढा देण्यासाठी अर्थमंत्रालयाने गुरुवारी १.७० लाख कोटींची पॅकेज जाहीर केले होते. रेपो दर कपातीनंतर शेअर बाजार तेजीत दिसून आली. सेन्सेक्स १००० अंकांनी तर निफ्टी ३०० अंकांनी वधारले आहेत. 



हेही वाचा -

कोरोनावर मात करण्यासाठी सरकारला शिवसेनेची साथ

Coronavirus Updates: आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणं १४ एप्रिलपर्यंत बंद




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा