कोरोनावर मात करण्यासाठी सरकारला शिवसेनेची साथ

शिवेसनेचे विधानसभा व विधान परिषदेचे सर्व आमदार, लोकसभा व राज्यसभेचे सर्व खासदार आपलं १ महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द करणार आहेत.

कोरोनावर मात करण्यासाठी सरकारला शिवसेनेची साथ
SHARES

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजनांसह शर्थीचे प्रयत्न करत आहे. पोलीस, डॉक्टरी यांसारखे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अहोरात्र सेवा पुरवत आहेत. मात्र या कोरोनाच्या संकटामुळं आर्थिक समस्या उद्भवण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळं या संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनासोबत काम करण्यासाठी शिवेसनेचे विधानसभा व विधान परिषदेचे सर्व आमदार, लोकसभा व राज्यसभेचे सर्व खासदार आपलं १ महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द करणार आहेत. 

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याबाबत माहिती दिली. खासदार व आमदारांनी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडं धनादेस जमा करण्याचं आवाहन देसाई यांनी केलं आहे. त्याशिवाय, राज्यातील शेतकरी, कामगार, मजूर, व गोरगरीब जनतेला या निधीचा निश्चित फायदा होईल, असा आशावाद देखील देसाई यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या संकटात मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सुनियोजित पद्धतीनं उपाययोजना करत आहे. तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो, अशी भूमिका घेत मुख्यमंत्री राज्यातील जनतेला सर्वोतोपरीने सहाय्य करीत आहेत. या लढाईत आपला देखील खारीचा वाटा असावा म्हणून शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत.हेही वाचा -

Coronavirus Updates: आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणं १४ एप्रिलपर्यंत बंद

Coronavirus Updates: कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मुंबई विद्यापीठाचा सरकारला मदतीचा हातसंबंधित विषय