Advertisement

Coronavirus Updates: आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणं १४ एप्रिलपर्यंत बंद

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणं १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत.

Coronavirus Updates: आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणं १४ एप्रिलपर्यंत बंद
SHARES

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणं १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. याबाबत नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नव्यानं सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाप्रकरणी देशभरात सध्या लॉकडाऊन आहे. ते घोषित होण्याआधीच केंद्र सरकारनं २४ व २५ मार्चच्या मध्यरात्रीपासून सर्व आंतरराष्ट्रीय सेवा स्थगित केल्या. तो निर्णय ३१ मार्चपर्यंत होता. 

या सर्व सेवा १४ एप्रिलपर्यंतच स्थगित असतील, असं डीजीसीए उपमहासंचालक सुनील कुमार यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (मिआल) या कंपनीला कळवले आहे. 

यादरम्यान सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा व व्हिसासेवा १४ एप्रिलच्या मध्यरात्री १२ पर्यंत स्थगित असणार आहे. यामध्ये फक्त आंतरराष्ट्रीय कार्गोसेवा सुरू असणार असं डीजीसीएनं परिपत्रकात म्हटले आहे.

या आहेत सरकारच्या सूचना

  • रेल्वे आणि नागरि उड्डयन सेवा विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांग कॅटेगरीमध्ये प्रवास करताना दिल्या जाणाऱ्या सवलती स्थगित केल्या जात आहेत.
  • मास्क आणि सॅनिटायझर्सचे आगाऊ पैसे वसूल करणाऱ्यांविरुद्ध फार्मा डिपार्टमेंट आणि ग्राहकांशी निगडीत अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करायला हवी.
  • राज्य सरकारांनी ६५ वर्षांपेक्षा अधिकच्या लोकांना घरातच राहण्याच्या सूचना जारी कराव्या. या सूचना वैद्यकीय कर्मचारी, सरकारी कर्मचारी, वैद्यकीय कामकाजाशी निगडीत कर्मचारी, लोकप्रतिनिधींना लागू होणार नाही.
  • १० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुला-मुलींना घरातच ठेवावे.



Coronavirus Updates: महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मोफत एसटी सेवा

Coronavirus Updates: कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मुंबई विद्यापीठाचा सरकारला मदतीचा हात



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा