Coronavirus Updates: महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मोफत एसटी सेवा

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्याला एसटीतून प्रवास मोफत प्रवास करता येणार आहे.

Coronavirus Updates: महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मोफत एसटी सेवा
SHARES

कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळं राज्य सरकरानं महाराष्ट्रातील दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून जीवनाश्यक वस्तूंची दुकानं वगळण्यात आली आहेत. तसंच, अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलं आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांमुधील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सेवा पुरवत आहेत. परंतु, या कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी नेहमीपेक्षा जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. कारण राज्यातील रेल्वे सेवा बंद असल्यानं केवळं एसटी आणि बेस्टनं कर्मचाऱ्यांना प्रवास करता येतो. मात्र हा प्रवास महाग असल्यानं या कर्मचाऱ्यांनी हा प्रवास मोफत करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करत अखेर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्याला एसटीतून प्रवास मोफत प्रवास करता येणार आहे. 

मुंबई महापालिकेनं अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाला २ कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळं पालिका कर्मचाऱ्याला एसटीतून प्रवास मोफत प्रवास करता येणार आहे. यासाठी पालिका कर्मचाऱ्याला एसटी वाहकाला ओळखपत्र दाखवणं बंधनकारक आहे. विरार, नालासोपारा, कल्याण, वाशी, पनवेल या शहरात मुंबई महापालिकेतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वास्तव्यास आहेत. 

लोकलच्या तुलनेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना जास्तीचं भाडं देऊन एसटीनं कार्यालयात जावं लागतं. त्यामुळं मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास करता यावा, यासाठी एसटी महामंडळाला २ कोटी रुपये देण्यात आले आहेत. यामुळे सध्या सुरू असलेल्या एसटीच्या अत्यावश्यक फेऱ्यांमधून प्रवास करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तिकीट काढण्याची आवश्यकता भासणार नाही.

या कर्मचाऱ्यांना सुविधा

बृहन्मुंबई महापालिका, शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, औषध दुकानदार, पोलिस या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी फेऱ्या सुरू आहेत. उपनगर ते मुंबईतील बोरिवली, वाशी, दादर व ठाणे (खोपट) या प्रमुख रेल्वे स्थानक आणि तेथून पुढे बेस्ट बसेसद्वारे शहरांतर्गत वाहतूक सुरू आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र जवळ बाळगणं गरजेचं आहे. हे केवळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ग्राह्य असणार आहे, असे एसटी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

या मार्गांवर धावताहेत एसटी

डोंबिवली-ठाणे, पनवेल-दादर, पालघर-बोरिवली, विरार- बोरिवली, टिटवाळा-ठाणे, आसनगाव- ठाणे, कल्याण-ठाणे, कल्याण -दादर, बदलापूर-ठाणे, नालासोपारा-बोरिवली या मार्गावर एसटी धावत आहेत, असे महामंडळानं स्पष्ट केलं.हेही वाचा -

Coronavirus Updates: महापालिकेतील हजारो आरोग्यसेविकांना हवा विमा

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास सुरू राहणार, मुख्यमंत्र्यांची घोषणासंबंधित विषय