Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्विकारलं विराट कोहलीचं 'ते' चॅलेंज!


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्विकारलं विराट कोहलीचं 'ते' चॅलेंज!
SHARES

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दिलेलं चॅलेंज स्विकारत एक व्यायामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओनंतर विराटने हे चॅलेंज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. यावर नरेंद्र मोदींनी आपण लवकरच विराट कोहलीचे हे चॅलेंज पूर्ण करणारा व्हिडीओ शेअर करणार असल्याचे ट्विटरवरुन सांगितले आहे.सुरुवात राज्यवर्धन राठोड यांच्यापासून!

केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी मंगळवारी संपूर्ण भारतातील जनतेने फिटनेसला प्रोत्साहन द्यावं यासाठी सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्याच कार्यालयात पुशअप मारुन 'हम फिट तो इंडिया फिट' असं म्हणत नागरिकांमध्ये फिटनेसबाबत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांनी पुशअप मारल्यावर अभिनेता हृतिक रोशन, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॅडमिंटन स्टार सायना नेहवालला असा व्हिडिओ करण्याचं चॅलेंज दिलं होतं.


 

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चॅलेंज कसं पूर्ण करणार? याकडे नेटिझन्स उत्सुकतेने पहात आहेत!हेही वाचा

विराटच्या मानेत लचक, बीसीसीआयचा खुलासा


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा