Advertisement

भारतात बॅडमिंटन प्रशिक्षकांची गरज - प्रकाश पदुकोण


भारतात बॅडमिंटन प्रशिक्षकांची गरज - प्रकाश पदुकोण
SHARES

भारतात गोपीचंद पुल्लेला व्यतिरीक्त आणखी प्रशिक्षक असणे गरजेचे आहेत. खेळाची वाढ होते, पण त्यासोबतच प्रशिक्षक देखील असणे गरजेचे आहे. भारतात प्रशिक्षकांची कमतरता आहे. पीव्ही सिंधूच्या ऑलिंम्पिक पदकामुळे देशात या खेळाची प्रसिद्धी वाढली. पण उत्तम दर्जदार प्रशिक्षकांची कमतरता आहे, असे मत सोमवारी टाटा ओपनच्या इंडियन इंटरनॅशल चॅलेनच्या उद्घाटनावेळी माजी बॅडमिंटपटू प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केलं.


प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर देण्याची गरज

पदुकोण यांनी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने बॅडमिंटन आणि शूटिंगमध्ये चांगले प्रशिक्षक लाभावे, यासाठी प्रशिक्षकांचं शिबीर आयोजित केलं होतं. जेणेकरून ऑलिंम्पिकमध्ये खेळाडू चांगलं प्रदर्शन करतील. 'आमच्याकडे काही चांगले प्रशिक्षक आहेत, पण आतंरराष्ट्रीय पातळीवर अपग्रेड होण्याची संधी ते साधत नाहीत. जर बॅडमिंटनची प्रगती करायची असल्यास आम्हाला गरज आहे ते प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर देण्याची, विशेष म्हणजे टीयर २ आणि टीयर ३ शहरांमध्ये'.

ते पुढे म्हणाले की 'परदेशी प्रशिक्षकच भारतीय प्रशिक्षकांना चांगलं प्रशिक्षित करू शकतात. जर एका वर्षात ५०-१०० भारतीय प्रशिक्षक तयार झाले, तर भारतात बॅंडमिंटनची चांगली प्रगती होईल', असे सांगत त्यांनी भारतातील बॅडमिंटन खेळातील प्रशिक्षकांबद्दल आपलं मत मांडलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा