इंटर फुटबॉल स्पर्धेत रेड डेव्हिल्सला बहुमान

 Sewri

See all
Sewri , Mumbai  -  

शिवडी - एक दिवसीय फुटबॉल स्पर्धेत रेड डेव्हिल्स संघानं विजेतेपद पटकावलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 206 चे शाखाध्यक्ष शेखर मोकल आणि फिश बॉइज स्टार मित्र मंडळ यांच्या वतीने 27 डिसेंबरला ही स्पर्धा घेण्यात आली. शिवडी कोळीवाड्यातल्या बीपीटी मैदानात झालेल्या या सामन्यात डी. के. फिवेस या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. या दोन्ही संघांना मनसे महाराष्ट्र उपाध्यक्ष नंदू चिले यांच्या हस्ते आकर्षक चषक, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले होते. या वेळी उपाध्यक्ष अशोक पाटील, शाखाध्यक्ष देवेन पाटील, स्वराज चव्हाण आदीही उपस्थित होते.

Loading Comments