Advertisement

रिलायन्स होम फायनान्स फिडे बुद्धिबळ स्पर्धेला सुरूवात


रिलायन्स होम फायनान्स फिडे बुद्धिबळ स्पर्धेला सुरूवात
SHARES

रिलायन्स होम फायनान्स खुली फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेस आज सकाळी 10 वाजता मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नितीन वर्दे आणि संयोजक विहंग कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ होणार आहे. स्पर्धेत राज्यातील इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी, इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे, फिडे मास्टर सौरभ खेडेकर आणि राज्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फिडे गुणांकित 122 बुद्धिबळपटूंसह 251 खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये स्पर्धेपूर्वी एक तास आधी येणाऱ्या स्पर्धकांनाही समाविष्ट केले जाणार आहे.

युनिव्हर्सल चेस फाउंडेशन आणि दहिसर स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने होणारी रिलायन्स होम फायनान्स फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा आजपासून 19 एप्रिल पर्यंत सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होईल. राज्यातील सर्व खेळाडूंसाठी खुली असलेली ही स्पर्धा मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना, ऑल मराठी चेस असोशिएशन, ऑल इंडिया चेस फेडरेशन आणि फिडे यांच्या मान्यतेने समाज कल्याण केंद्र, दहिसर विद्या मंदिर शाळे शेजारी, दहिसर (पू.) येथे होत आहे. विजेत्या आणि उपविजेत्यांना एकूण तीन लाख रुपयांचे 47 पुरस्कार असून मुलामुलींना प्रोत्साहन देण्यासाठी एकूण 42 आकर्षक चषक स्वरुपात पुरस्कार दिले जाणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा