रोहित, अजिंक्यला अर्जुन पुरस्कार

  Pali Hill
  रोहित, अजिंक्यला अर्जुन पुरस्कार
  मुंबई  -  

  मुंबई : टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्लीच्या नेहरू स्टेडिअममध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या हस्ते दोन मुंबईकर क्रिकोटपटूंना हा पुरस्कार देण्यात आला. अजिंक्यला 2016चा तर रोहितला गतवर्षीचा पुरस्कार यंदा देण्यात आला. या दोघांनाही अर्जुन पुरस्कार पूर्वीच जाहीर झाले होते. मात्र ते दोघही अांतरराष्ट्रीय टूर्नामेंटमध्ये व्यस्त असल्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पुरस्कार घेता आला नव्हता.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.