Advertisement

फिडे बुद्धिबळ स्पर्धेत आयएम समीरचा दुसरा विजय


फिडे बुद्धिबळ स्पर्धेत आयएम समीरचा दुसरा विजय
SHARES

इंटरनॅशनल मास्टर-आयएम समीर कठमाळेने कॅरोकन पद्धतीने डावाची सुरूवात करून 44 व्या चालीला इंटरनॅशनल फिडे गुणांकित (1230) बुद्धिबळपटू कृष्णा सोनीच्या राजास जेरीस आणले आणि दुसऱ्या रिलायन्स होम फायनान्स ओपन फिडे बुद्धिबळ स्पर्धेतल्या दुसऱ्या साखळी सामन्यात विजय मिळवून सलग दुसरा गुण वसूल केला. 

युनिव्हर्सल चेस फाउंडेशन आणि दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने सुरू झालेल्या स्पर्धेत अग्रमानांकित राकेश कुलकर्णी, इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी, फिडे मास्टर सौरभ खेडेकर, अमरदीप बारटक्के, अतुल डहाळे, ओमकार कडव, रणवीर मोहिते आदी राज्यातील इंटरनॅशनल फिडे गुणांकित बुद्धिबळपटूंनी दुसरा गुण मिळवत विजयाची दौड कायम राखली.

दहिसर विद्या मंदिर शाळेजवळच्या समाज कल्याण केंद्रात सुरू झालेल्या फिडे बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या क्रमांकाच्या टेबलवर अग्रमानांकित राकेश कुलकर्णीने इंटरनॅशनल फिडे गुणांकित (1217) बुद्धिबळपटू जयवीर मेहेन्द्रूचा झटपट पराभव केला. स्कॉच पद्धतीचा अवलंब करणाऱ्या राकेशने 30व्या चालीला प्रतिस्पर्ध्याला शरणागती पत्करण्यास भाग पाडले.

तिसऱ्या टेबलवर इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीने इंटरनॅशनल फिडे गुणांकित (1210) बुद्धिबळपटू आयुश शेठचे आव्हान 30 चालीत संपुष्टात आणताना रॉय लोपेझ पद्धतीचा डाव रचला. इंटरनॅशनल फिडे गुणांकित बुद्धिबळपटूंमधील अन्य लढतीमध्ये चिन्मय कुलकर्णीने सौमील गोगटेचा, सौराव्ह खर्डेकरने हर्ष वर्तकचा, अमरदीप बारटक्केने क्षत्रिय नितीन वेखंडेचा, अतुल डहाळेने अशोक यशवंतचा, ओमकार कडवने जिवील पारेखचा तर रणवीर मोहितेने जय मेहेतालीयाचा पराभव करून दुसरा गुण वसूल केला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा