Advertisement

फिनलँड मोटारस्पोर्टस रॅलीसाठी संजय टकले सज्ज


फिनलँड मोटारस्पोर्टस रॅलीसाठी संजय टकले सज्ज
SHARES

अाशिया पॅसिफिर मोटारस्पोर्टस रॅली मालिकेतील माजी विजेता संजय टकले अाता जागतिक रॅली मालिकेत पदार्पणासाठी सज्ज झाला अाहे. फिनलँडमधील जायवस्की येथे २६ ते २९ जुलैदरम्यान होणाऱ्या मोटारस्पोर्टस शर्यतीत तो पदार्पण करणार अाहे. जागतिक रॅलीमध्ये सहभागी होणारा तो महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताचा पहिला ड्रायव्हर ठरणार अाहे. बाल्टिक मोटारस्पोर्टस प्रमोशनने सुसज्ज केलेली फोर्ड फिएस्टा अार-२ ही कार तो चालवणार असून ब्रिटनचा डॅरेन गॅराॅड त्याचा नेव्हिगेटर असेल.



खडतर मार्ग

क्रिकेटमध्ये लाॅर्डस अाणि टेनिसमध्ये विम्बल्डन ही त्या खेळाची पंढरी समजली जाते, तशीच गणना रॅलीमध्ये फिनलँडची केली जाते. या रॅलीचा मार्ग हा अतिशय खडतर, अरुंद असल्यामुळे स्पर्धकाचे कौशल्य, एकाग्रता पणाला लागते. त्याचबरोबर कार सुस्साट वेगात असताना काळजाचा थरकाप उडवणाऱ्या उंच-उंच उड्या ड्रायव्हर्सना घ्याव्या लागणार अाहेत.


अशी असेल रॅली?

पहिल्या दिवशी (शुक्रवारी) मोक्सी, यूरिया, असामाकी, अनेकोस्की या परिसरातील अनेक नव्या मार्गांवर प्रत्येकी दोन स्टेेजेस त्यानंतर अोट्टिला व हार्जू येथे प्रत्येकी एक अशा १० फेऱ्या होणार अाहेत. शनिवारी पैजाला, पिहालाजाकोस्की, काकारिस्टो, टुअोहीकोटानन या चार ठिकाणी प्रत्येकी दोन फेऱ्या रंगणार अाहेत. रविवारी लौका, रुहिमाकी येथे प्रत्येकी दोन फेऱ्या होणार असून रॅलीचे एकूण अंतर ३१७.२६ किमी असणार अाहे. जागतिक रॅलीत १३ राऊंड होणार असून त्यातील ९ राऊंड्स विचारात घेतल्यानंतरच विजेत्याची घोषणा केली जाणार अाहे.


हेही वाचा -

सचिन तेंडुलकरची नवी इनिंग, करणार कोचिंग!

मुंबईकर अजिंक्य रहाणेचं भारतीय संघात कमबॅक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा