७ एप्रिलला रंगणार ६ वी सतीश सबनीस बुद्धिबळ स्पर्धा

सतीश सबनिस बुद्धिबळ स्पर्धेचे ६ वे पर्व ७ एप्रिलला होणार आहेत. मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ असोशिएशनच्या मान्यतेनं रविवार ७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता बुद्धिबळ स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

  • ७ एप्रिलला रंगणार ६ वी सतीश सबनीस बुद्धिबळ स्पर्धा
SHARE

दरवर्षीप्रमाणं यंदाही सतीश सबनीस बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून स्पर्धेचं हे ६ वं पर्व असणार आहे. मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनच्या मान्यतेनं ही स्पर्धा होत आहे. रविवार ७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता या बुद्धिबळ स्पर्धेचा थरार वांद्रे पूर्वेकडील एमआयजी क्लब इथं रंगणार आहे. सतीश सबनीस फाऊंडेशन आणि एमआयजी क्लबतर्फे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.  


अंधांना नि:शुल्क प्रवेश 

सतीश सबनीस बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना नोंदणी करावी लागणार असून यासाठी ५०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहेत. या स्पर्धेमध्ये दृष्टिहीन स्पर्धकांना नि:शुल्क प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धकांना वांद्रे पूर्वेकडील एमआयजी क्लब इथं स्पर्धेबाबतची अधिक माहिती मिळेल. या स्पर्धेतील विजेत्यांना १ लाख ७५ हजार रुपयांचं पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  


१९८४ साली पहिली स्पर्धा

राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ खेळाडू सतीश सबनीस यांनी १९८४ साली पहिल्या बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन केलं होतं. सतीश सबनीस हे महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या अध्यक्षपदी होते. तसंच, अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनचे उपाध्यक्ष आणि दुबई बुद्धिबळ ऑलिंपियाडचे व्यवस्थापक देखील होते.हेही वाचा -

लसिथ मलिंगाचा अखेरचा चेंडू होता नो बॉल, सामन्यानंतर विराटनं सुनावलं पंचांना

रे रोड ठरलं वायफाय असलेलं हजारावं हायफाय स्टेशन!संबंधित विषय
ताज्या बातम्या