Advertisement

लसिथ मलिंगाचा अखेरचा चेंडू होता नो बॉल, सामन्यानंतर विराटनं सुनावलं पंचांना

बंगळुरुला सात धावांची गरज असताना मलिंगानं अखेरच्या चेंडूवर फक्त एकच धाव दिली आणि मुंबईनं विजयोत्सव साजरा केला. मात्र, सामना संपल्यानंतर हा नो बॉल असल्याचं समजलं.

लसिथ मलिंगाचा अखेरचा चेंडू होता नो बॉल, सामन्यानंतर विराटनं सुनावलं पंचांना
SHARES

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरु यांच्यात बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या अटीतटीच्या समान्यात मुंबई इंडियन्सनं विजय मिळवला. हा समाना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. यावेळी सात धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूवर बंगळुरुला फक्त एकच धाव घेता आली. त्यामुळं हा सामना मुंबईनं ६ धावांनी जिंकला. मात्र, अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सच्या मलिंगानं टाकलेला शेवटचा चेंडू नो बॉल असल्याचं सामना संपल्यावर लक्षात आलं. तसंच, हा चेंडू नो बॉल असल्याचं बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला समजलं तेव्हा कोहली चांगलाच चिडलेला पाहायला मिळाला. त्याशिवाय सामना संपल्यानंतर आपलं मत व्यक्त करताना त्यानं पंचांना चांगलंच  सुनावलं.


अखेरचा चेंडू नो बॉल

बंगळुरुला सात धावांची गरज असताना मलिंगानं अखेरच्या चेंडूवर फक्त एकच धाव दिली आणि मुंबईनं विजयोत्सव साजरा केला. मात्र, सामना संपल्यानंतर हा नो बॉल असल्याचं लक्षात येताच कोहलीनं याबाबत विचारणा केली. परंतू, सामन्याचा निकाल लागल्यामुळं बंगळुरुला पराभव पत्करावा लागला.


प्रत्येक चेंडू महत्त्वाचा

दरम्यान, ‘आयपीएलसारख्या स्पर्धेमध्ये प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे. हा आयपीएलचा सामना होता एखाद्या क्लब क्रिकेटचा नाही. पंचांनी मैदानात डोळे उघडे ठेवून उभं राहणं अपेक्षित आहे. शेवटच्या चेंडूवर पंचाचा निर्णय मूर्खपणाचा होता. इथं थोड्याश्या फरकानं देखील समान्याच्या निकालावर फरक पडतो. त्यामुळं पंचांनी अशा अटीतटींच्या समान्यांमध्ये जास्त काळजी घ्यायला पाहिजे.’ असं सामना संपल्यावर आपलं मत व्यक्त करताना विराटनं पंचांना चांगलचं सुनावलं.हेही वाचा -

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ६ धावांनी विजय

अमित शहांच्या अर्ज भरतेवेळी उद्धव ठाकरे राहणार उपस्थितसंबंधित विषय
Advertisement