शारदाश्रम विद्यामंदिरच्या मुलींचा दणदणीत विजय

  Mumbai
  शारदाश्रम विद्यामंदिरच्या मुलींचा दणदणीत विजय
  मुंबई  -  

  मरीन लाइन्स - एमएसएसए मनोरमाबाई आपटे स्मृती 16 वर्षांखालील मुलींच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत शारदाश्रम विद्या मंदिरच्या मुलींनी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनलचा 9 विकेट्सनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल संघाच्या मुलींनी 12.1 षटकांत 32 धावा केल्या होत्या. मात्र शारदाश्रमने 33 धावांचं आव्हान सात षटकांत पूर्ण करत दणदणीत विजय मिळवला. अस्की गुरव, कृतिका महिंद्राकर आणि निर्मिती राणे यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.

  Loading Comments
  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.