Advertisement

गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीने रंगला शिवछत्रपती पुरस्कारांचा सोहळा


गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीने रंगला शिवछत्रपती पुरस्कारांचा सोहळा
SHARES

तब्बल तीन वर्षांनंतर राज्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या क्रीडा पुरस्कारांना म्हणजेच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांना मुहूर्त मिळाला. भारताचं प्रवेशद्वार असलेल्या एेतिहासिक अशा गेटवे आॅफ इंडियाच्या साक्षीने तीन वर्षांच्या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या १९५ खेळाडू, प्रशिक्षक, संघटक आणि माजी खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांनी गौरवण्यात आले. २०१४-१५ सालासाठीच्या जीवनगौरव पुरस्काराने पुण्याच्या रमेश दातार यांना, २०१५-१६ सालासाठीच्या जीवनगौरव पुरस्काराने पुण्याच्याच डाॅ. अरुण दातार यांना तर २०१६-१७ सालासाठीच्या जीवनगौरव पुरस्काराने बिभीषण पाटील यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


पुरस्कार विजेत्यांमध्ये कोण ?

२०१४-१५, २०१५-१६ आणि २०१६-१७ या तीन वर्षांसाठीच्या शिवछत्रपती पुरस्कारांचे वितरण शनिवारी करण्यात आले. या पुरस्कार विजेत्यांमध्ये ग्रॅंडमास्टर विदीत गुजराती आणि अक्षयराज कोरे, क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे, हाॅकीपटू युवराज आणि देविंदर वाल्मिकी, कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे आणि नितीन मदने, धावपटू ललिता बाबर आणि संजीवनी जाधव, रोईंगपटू दत्तू भोकनळ, टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा यात समावेश आहे.


मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती

राज्याच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारांचे वितरण ऐतिहासिक गेट वे आॅफ इंडियावर होत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र यावेळी अनुपस्थित होते. २०२० आॅलिम्पिकमध्ये राज्यातून पदकविजेते खेळाडू घडवण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असून राज्याच्या प्रमुखांचीच अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा