• शिवनेरी, विद्यार्थी क्रीडा केंद्राला मुंबई जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतपद
  • शिवनेरी, विद्यार्थी क्रीडा केंद्राला मुंबई जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतपद
SHARE

मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने दादरच्या पोर्तुगीज चर्च येथील केशवराव दाते उद्यानात रंगलेल्या मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत मुलींमध्ये दादरच्या शिवनेरी सेवा मंडळाने तर कुमारांमध्ये विद्यार्थी क्रीडा केंद्राने विजेतेपदावर मोहोर उमटवली. शिवनेरीने अमर हिंद मंडळावर मात करत विजेतेपदाला गवसणी घातली तर विद्यार्थी क्रीडा केंद्राने गतविजेत्या अोम समर्थला हरवत विजेतेपदावर मोहोर उमटवली.शिवनेरीला नऊ वर्षांनंतर विजेतेपद

उत्कंठावर्धक रंगलेल्या मुलींच्या अंतिम फेरीच्या सामन्यात शिवनेरी सेवा मंडळाकडे मध्यंतराला एका गुणाची अाघाडी होती. पण त्यानंतर खेळ उंचावत शिवनेरीने अमर हिंद मंडळाचे कडवे अाव्हान ८-५ असे तीन गुणांनी परतवून लावले. शिवनेरीकडून प्रतिक्षा महाजन (४ गडी), साईली म्हैसधुणे (४:०० व ५:०० मि. संरक्षण) तसेच प्रगती ढाणे (३:१० मि. संरक्षण) यांनी विजयात मोलाची भूमिका निभावली.विद्यार्थीने घेतला पराभवाचा वचपा


गेल्या वर्षी विद्यार्थी क्रीडा केंद्राला अोम समर्थ व्यायाम मंदिराकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण या वर्षी मात्र त्यांनी पराभवाचा वचपा काढत विजेतेपदावर नाव कोरले. विद्यार्थीने अोम समर्थवर ११-१० असा एका गुणाने विजय मिळवला. विद्यार्थीकडून प्रसाद डांगे (१:४० मि. संरक्षण व ३ गडी), रसाळ प्रेम (४:००, १:२० मि. संरक्षण) पंकज कांबळे (२:१० मि., २:१० मि संरक्षण) यांनी चांगला खेळ केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या