Advertisement

मुंबई महापौर खो-खो स्पर्धेत श्री सह्याद्री, महात्मा ठरले विजेते


मुंबई महापौर खो-खो स्पर्धेत श्री सह्याद्री, महात्मा ठरले विजेते
SHARES

दादरमधील केशवराव दाते उद्यानात रंगलेल्या ३१व्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेत पुरुषांच्या गटात श्री सह्याद्री अाणि महिलांमध्ये महात्मा गांधी स्पोर्टस अकादमीने विजेतेपदावर मोहोर उमटवली. दोन्ही गटांत मुंबई उपनगरच्या संघांचा बोलबाला पाहायला मिळाला. पुरुषांच्या अंतिम फेरीत जादा डावापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात श्री सह्याद्री संघाने अोम समर्थ भारत व्यायाम मंदिरवर २२-१९ असा विजय मिळवला. महिलांमध्ये महात्मा गांधी स्पोर्टस अकादमीला विजेतेपदासाठी संघर्ष करावा लागला. अखेरत ८-७ अशा एका गुणाच्या फरकाने त्याांनी दादरच्या शिवनेरी सेवा मंडळाचे अाव्हान धुडकावून लावले.



पुरुषांमध्ये जादा डावापर्यंत रंगला थरार

मध्यंतराला ९-९ अशी स्थिती असताना ओम समर्थच्या विलास कारंडेने सुंदर संरक्षण करत सामन्यात रंगत अाणली. सह्याद्रीच्या संरक्षकांनीही अप्रतिम खेळ करत त्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिले अाणि सामना बरोबरीत अाणला. अखेर जादा डावापर्यंत रंगलेल्या या अंतिम सामन्यात श्री सह्याद्रीने तीन गुणांच्या फरकाने विजेतेपद खेचून अाणले. जिगरी खेळ करत तेवढेच तुल्यबळ उत्तर दिले आणि सामना बरोबरीत आणला. श्री सह्याद्रीतर्फे अक्षय भांगरेने १:००, २:१०, ०:४० नाबाद मिनिटे संरक्षण करत ३ गडी बाद केले. दुर्वेश साळुंखेने १:२० मि., १:१० मि., २:४० मिनिटे संरक्षण करत ४ गडी बाद केले.


शिवनेरीच्या संरक्षकांचे प्रयत्न तोकडे पडले

महिलांच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधी स्पोर्टस अकादमीने शिवनेरी सेवा मंडळावर अवघ्या एका गुणाने विजय मिळवला. मध्यंतराला शिवनेरीकडे एका गुणांची आघाडी होती. मात्र दुसऱ्या डावात शिवनेरीच्या संरक्षकांना आपले संरक्षण करणे तेवढे जमले नाही आणि त्यांना सामना गमवावा लागला. महात्मातर्फे साक्षी वाफेलकर हिने ३:१०, ४:२० मिनिटे संरक्षण करून अष्टपैलू खेळ केला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा