श्रीकांत वाड आंतराष्ट्रीय बॅडमिंटन परिषदेत

  Pali Hill
  श्रीकांत वाड आंतराष्ट्रीय बॅडमिंटन परिषदेत
  मुंबई  -  

  मुंबई - जागतिक स्तरावर बॅडमिंटन खेळाच्या आधुनिक तंत्राचे आदान-प्रदान करणे आणि आशियामध्ये बॅडमिंटन खेळाचा प्रचार-प्रसारासाठी आशिया संघटनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा परिषदेत महाराष्ट्राचे ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत वाड आणि उत्तर प्रदेशचे डॉ. अन्सारी या दोनच भारतीयांची निवड करण्यात आली. बँकॉक येथे ७ ते १२ आॅक्टोबर या कालावधीत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने (बीएआय) पहिल्या क्रमांकचे प्रशिक्षक म्हणून श्रीकांत वाड यांची निवड केली. तर दुसऱ्या क्रमांकावर डॉ. अन्सारी यांची वर्णी लागली. देशभरातून ३५ प्रशिक्षकांची परिषदेसाठी बीएआयच्या वतीने चाचपणी करण्यात आली होती. परिषदेत जगातील सर्वोत्कृष्ठ माजी खेळाडू रेकसी मिनाकी, पीटर गेड यांचा समावेश असणार आहे. ठाणे महापालिका संचलित सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेत १९८८ पासून वाड बॅडमिंटन खेळाचे धडे देत आहेत. वाड यांनी १९९० साली बिजिंग आणि १९९४ साली हिरोशिमा येथे झालेल्या आशियाई खेळांच्या स्पोर्ट्स सायन्स काँग्रेसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत बॅडमिंटनवर शोधनिंबध सादर केला. त्यांनी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशनचा अ‍ॅडव्हान्स प्रशिक्षण अभ्यासक्रम (हाँगकाँग १९९३), आशियाई प्रशिक्षण शिबीर (मलेशिया २०००) आणि आशियाई लेव्हल १ प्रशिक्षण कोर्स (२००४) हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.