शालेय कबड्डी स्पर्धेत एसकेएम, एसएसबी विजयी

  Mumbai
  शालेय कबड्डी स्पर्धेत एसकेएम, एसएसबी विजयी
  मुंबई  -  

  वडाळा - शालेय मुलांच्या सुपर लीग प्राथमिक चाचणी कबड्डी स्पर्धेत एसकेएम संघाने इलेव्हन डीएसके संघाचा 39-37 असा पराभव केला. अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात इलेव्हन डीएसके संघाने शेवटच्या पाच मिनिटांपर्यंत आघाडी राखली होती. परंतु अष्टपैलू सिद्धार्थ भेकरेने अखेर विजयाचे पारडे एसकेएम संघाच्या बाजूने झुकवले. इलेव्हन डिएसके संघाला विजय मिळवून देण्यासाठी सुरज सुतारने शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी विशेष पुरस्काराचा मानकरी अष्टपैलू सिद्धार्थ भेकरे ठरला. 

  वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरात झालेल्या दुसऱ्या सामन्यात एसएसबी संघाने फोर स्टार कबड्डी संघावर 30-16 असा विजय मिळवताना एसएसबी संघाच्या खेळाडूंनी छान सांघिक खेळ केला. संपूर्ण दिवसभरात 240 शालेय खेळाडूंच्या 25 संघांनी सुपर लीग प्राथमिक चाचणी कबड्डी सामन्यांमध्ये भाग घेतला.

  सदर प्राथमिक चाचणी फेरीचे निरीक्षण माजी कबड्डीपटू सचिन आयरे, प्रशिक्षक दीपक कांदळगावकर, मुंबई पोलीस महिला संघाचे प्रशिक्षक विठ्ठल साळुंके, मुंबई पोलीस पुरुष संघाचे एकनाथ सणस, राष्ट्रीय खेळाडू किरण जीकमडे यांनी केले. याप्रसंगी मुंबई सुपर लीग कबड्डीचे सरचिटणीस लीलाधर चव्हाण यांनी कबड्डी नियमांची माहिती स्पर्धकांना दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.