धारावीत क्रीडा प्रशिक्षण शिबीर

 Dharavi
धारावीत क्रीडा प्रशिक्षण शिबीर
Dharavi, Mumbai  -  

धारावीत उन्हाळी क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 8 ते 16 वयोगटातील मुलांना सहभाग घेता येणार आहे.

या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय दर्जाच्या सर्व खेळांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कबड्डी, खो-खो, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, बुद्धिबळ, बॉक्सिंग, कॅरम, टेबल टेनिस, कराटे, ज्युडो, व्हॉलिबॉल, फेन्सिंग, त्वायकोंदो, किकबॉक्सिंग, योगा या खेळांच्या प्रशिक्षणाचा यात समावेश असणार आहे. दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 

हे शिबिर मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे 21 एप्रिल ते 17 मे या कालावधीत संध्याकाळी 7.30 ते 9.30 दरम्यान धारावीतील जिल्हा क्रीडा संकुल येथे भरवण्यात येणार आहे.

Loading Comments