Advertisement

शिवाजी पार्कमध्ये क्रीडा प्रशिक्षण शिबीर


शिवाजी पार्कमध्ये क्रीडा प्रशिक्षण शिबीर
SHARES

दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवाजी पार्कच्या श्री समर्थ व्यायाम मंदिरतर्फे क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावर्षी देखील या व्यायाम मंदिरामध्ये वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असून, 17 ते 26 एप्रिलपर्यंत हे शिबीर असणार आहे. या प्रशिक्षण शिबिरात एकूण 2000 खेळाडूंनी सहभाग घेतला असून, त्यामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्धांचाही सहभाग आहे.

या दहा दिवसांच्या शिबिरात कोणत्याही क्रीडा प्रकारासाठी आवश्यक मुलभूत, शारिरीक आणि मानसिक क्षमता विकसित करणे, विविध शारिरीक हालचालींचा समावेश तसेच कोणतेही उपकरण न वापरणे यावर भर दिला जातो. यासोबतच सूर्यनमस्कार, मल्लखांबचे विविध प्रकार, जिम्नॅस्टिक, खो-खो, व्हॉलिबॉल, ज्युडो यासारख्या विविध प्रकाराचे प्रशिक्षण या शिबिरात दिले जाणार आहे.

या शिबिरात आतापर्यंत ऑलिम्पिक हॉकीपटू पद्मश्री धनराज पिल्ले, सिनेदिग्दर्शक राजदत्त, पोलीस अधिकारी सोमनाथ घारगे यांच्यासह एम इंडिकेटरचे संस्थापक सचिन टेके, आतंरराष्ट्रीय जलतरणपटू मिलिंद सोमण उपस्थित होते. शिबिराचे ध्वजारोहण महिला आंतराष्ट्रीय कबड्डीपटू लता पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा