Advertisement

विराट कोहली, मीराबाई चानूची खेलरत्नसाठी शिफारस


विराट कोहली, मीराबाई चानूची खेलरत्नसाठी शिफारस
SHARES

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली अाणि वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू यांची देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी म्हणजेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात अाली अाहे. क्रीडा मंत्रालयाने शिफारशी मंजूर केल्यास, सचिन तेंडुलकर (१९९७) अाणि महेंद्रसिंग धोनी (२००७) यांच्यानंतर खेलरत्न पुरस्कार पटकावणारा विराट कोहली हा भारताचा तिसरा क्रिकेटपटू ठरेल.


किदम्बी श्रीकांत होता शर्यतीत

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी याअाधी कोहलीसह भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याचं नाव घेतलं जात होतं. गेल्या वर्षी सुपर सीरिज स्पर्धांमध्ये श्रीकांतनं अापला दबदबा राखला होता. पण चानू हिने ४८ किलो वजनी गटात विश्वविक्रमासह विश्वविजेती होण्याचा मान पटकावला अाणि श्रीकांत या शर्यतीतून बाहेर पडला.


कोहलीची कामगिरी

अायसीसी रँकिंगमध्ये जगातील अव्वल क्रमांकाचा कसोटी फलंदाज म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या कोहलीने गेल्या तीन वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी केली अाहे. २०१६ अाणि २०१७ मध्ये त्याला या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले नव्हते. २९ वर्षीय कोहलीने ७१ कसोटी सामन्यात २३ शतकांसह ६१४७ धावा तर २११ वनडेमध्ये ३५ शतकांसह ९७७९ धावा केल्या अाहेत. अांतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनंतर (१०० शतके) सर्वाधिक शतकांचा मान पटकावणारा कोहली (५८ शतके) हा भारताचा दुसरा फलंदाज ठरला अाहे. विशेष म्हणजे खेलरत्न पुरस्काराअाधी पद्मश्री मिळवणारा कोहली हा भारतातील दुर्मिळ अशा खेळाडूंपैकी एक अाहे.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा