राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर

 Mumbai
राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर
राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर
See all
Mumbai  -  

मुंबई - विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी महाराष्ट्र संघाच्या नेतृत्वपदाची जबाबदारी ठाण्याच्या महेश शिंदेकडे सोपवण्यात आली आहे. 27 व्या पुरुष आणि महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी राज्य संघ जाहिर करण्यात आला आहे. रत्नागिरीच्या आरती कांबळेकडे महिला संघांची धुरा देण्यात आली आहे. उस्मानाबाद इथल्या तुळजा भवानी क्रीडा संकुलात 11 ते 13 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय खो-खो स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेत दोन्ही गटात प्रत्येकी आठ संघ विजेतेपदासाठी झुंजणार आहेत. तर, यावर्षी ही महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजेतेपद मिळवतील, असा विश्वास राज्य संघटनेचे सचिव चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला.

Loading Comments