Advertisement

मुंबईकर सुनित जाधव तळवलकर क्लासिक स्पर्धेत उपविजेता


मुंबईकर सुनित जाधव तळवलकर क्लासिक स्पर्धेत उपविजेता
SHARES

तरुणांच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या तळवलकर क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धेत गेल्यावर्षी दुसरा क्रमांक पटकावलेल्या यतिंदर सिंगने यंदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. पण सुरुवातीपासूनच मुंबईकरांचा पाठिंबा मिळवलेल्या सुनित जाधवला मात्र उपविजेतेपदावर सामाधान मानावं लागलं. ही स्पर्धा मंगळवारी माटुंगा येथील षन्मुखानंद सभागृहात पार पडली.या स्पर्धेत देशभरातील अव्वल ३० शरीररसौष्ठवपटूसह एकूण २२० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून अंतिम १० स्पर्धकांची निवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राच्या ६ खेळाडूंनी आपली चमक दाखवली, तर रेल्वे आणि सेना दलातील खेळाडूंनी टॉप १० मध्ये वर्चस्व राखलं. यतिंदरने हा खिताब पटकावत ६ लाख रुपयांचं बक्षिस मिळवलं. तर सुनित जाधवला ३ लाख रुपयांचं बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आलं.मला काहीही करून ही स्पर्धा जिंकायची होती. या स्पर्धेसाठी मी खूप मेहनत घेतली होती. गेल्यावेळी मला दुसरा क्रमांक मिळाला होता. मी स्पर्धा जिंकलो नसतो तर शरीरसौष्ठव सोडून तरुण मुलांना प्रशिक्षण देण्याचा विचार केला होता.
- यंतिंदर सिंग, विजेतास्पर्धेतील अव्वल १० खेळाडू :

  1. यतिंदर सिंग - उत्तर प्रदेश
  2. सुनित जाधव - महाराष्ट्र
  3. बॉबी सिंग - भारतीय रेल्वे
  4. सागर कातुर्डे - महाराष्ट्र
  5. महेंद्र चव्हाण - महाराष्ट्र
  6. सर्बो सिंग - भारतीय रेल्वे
  7. अक्षय मोगरकर - महाराष्ट्र
  8. रोहित शेट्टी - महाराष्ट्र
  9. दयानंद सिंग - सेनादल
  10. झुबेर शेख - महाराष्ट्रहेही वाचा - 

तळवळकरांच्या क्लासिकल शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी 20 लाखांचे बक्षिस

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा