Advertisement

मुंबईकर सुनित जाधव तळवलकर्स क्लासिकसाठी सज्ज


मुंबईकर सुनित जाधव तळवलकर्स क्लासिकसाठी सज्ज
SHARES

तळवलकर्स क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारत श्री सुनित जाधवसह महेंद्र चव्हाण, यतिंदर आणि बॉबी सिंगसह आणखी शरीरसौष्ठवपटू रिंगणात उतरले आहेत. मंगळवारी षण्मुखानंद सभागृहात रंगणाऱ्या टॉप टेनचे पीळदार ग्लॅमर निवडण्यासाठी तळवलकर्स क्लासिकची प्राथमिक फेरी सोमवारी जुहूच्या समुद्र किनारी असलेल्या हॉटेलमध्ये पार पडणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले 30 शरीरसौष्ठवपटू टॉप टेनसाठी आपले कसब पणाला लावतील.


हे 30 खेळाडू आंतर्राष्ट्रीय दर्जाचे

व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित भारतातील श्रीमंत स्पर्धांपैकी एक असलेल्या तळवलकर्स क्लासिकची मुंबईत जोरदार हवा निर्माण झाली आहे. या स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आलेले सर्व 30 खेळाडू आंतर्राष्ट्रीय दर्जाचे आहेत. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच खेळाडूंना रोख पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.


पुरूष-महिला शरीरसौष्ठवपटूंच्या पाच जोड्यांचे आकर्षण

या स्पर्धेत पुरूष आणि महिला शरीरसौष्ठवपटूंच्या पाच जोड्या सहभागी झाल्या आहेत. आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी पुरुषांसाठी ही स्पर्धा होती. पण येथे महिलांनादेखील प्रोत्साहन देत मिश्र गट म्हणजेच पुरुष आणि महिला अशी जोडी मंचावर उतरणार असून आपल्या पीळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करणार आहेत.

या स्पर्धेत विजेत्याला 6 लाखांचे बक्षिस दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी सुनीत जाधव, सागर जाधव, बॉबी सिंग, महेंद्र चव्हाण, यतिंदर सिंग, झुबेर शेख यांसारखे एकापेक्षा एक स्पर्धक गेल्या तीन महिन्यांपासून तयारी करत आहेत. यावेळी रेल्वे आणि महाराष्ट्राच्याच खेळाडूंचं वर्चस्व राहील, अशी शक्यता आहे. 

या स्पर्धेत 30 पैकी 9 रेल्वेचे तर 10 महाराष्ट्राचे स्पर्धक आपल्या शरीरसौष्ठवाचा नजराणा पेश करतील. महाराष्ट्राचे दहाच्या दहा खेळाडू फॉर्ममध्ये असल्यामुळे किमान पाच जण तरी अंतिम फेरीत धडकतील, असा विश्वास महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस अॅड. विक्रम रोठे यांनी व्यक्त केला.हेही वाचा

भारतातील 'हे' अव्वल 34 शरीरसौष्ठव एकमेकांना भिडतील


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा