Advertisement

भारतातील 'हे' अव्वल 34 शरीरसौष्ठव एकमेकांना भिडतील


भारतातील 'हे' अव्वल 34 शरीरसौष्ठव एकमेकांना भिडतील
SHARES

भारतीय शरीरसौष्ठव खेळातील सर्वात प्रतिष्ठेची आणि तरुणांना आकर्षित करणारी तळवलकर क्लासिक स्पर्धा येत्या 27 ते 28 नोव्हेंबरला मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात रंगणार आहे. याची प्रथामिक फेरी ही जुहू येथील हॉटेलमध्ये होणार असून अंतिम रंगत ही षण्मुखानंद येथे पार पडणार आहे. यास्पर्धेसाठी महाराष्ट्रासह तामिळनाडू, ओडीशा, हरियाणा आणि दिल्ली येथून खेळाडू सहभाग होणार आहेत.


34 स्पर्धकांचा सहभाग

विशेष म्हणजे या स्पर्धेत मिस्टर वर्ल्ड, मिस्टर एशिया आणि मिस्टर इंडिया खिताब पटकावलेले नामांकीत शरीरसौष्ठव स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहे. पहिल्यांदाच मुंबईकरांना या नामांकित स्पर्धाकांना पाहण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव कमावलेले 34 स्पर्धक यात सहभाही होणार आहेत. ही स्पर्धा इंडियन बॉडी बिल्डर्स यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली आहे.



विजेत्या स्पर्धकाला 6 लाख रुपयांचे बक्षीस

या स्पर्धेत 20 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या बक्षिसामुळे नवोदित खेळाडूंची ओढ याकडे वाढेल आणि शरीरसौष्ठव स्पर्धेला स्पर्धाकांचा चांगला प्रतिसाद मिळेल. यात विजेत्या स्पर्धकाला 6 लाख रुपये मिळणार आहेत. उपविजेत्याला 3 लाख रुपये तर तृतीय क्रमांकास 50 हजार रुपये आणि अव्वल दहा खेळाडूंना देखील यात रोख बक्षिसे दिले जातील. या स्पर्धेत एकाच मंचावर नामांकित खेळाडू उतरणार असल्यामुळे सर्व खेळाडूंसमोर एक तगडे आव्हान असणार आहे.


मुंबईकर सुनीत जाधव देखील उतरणार मैदानात

दोनवेळा भारत श्री खिताब पटकावलेला सुनीत जाधव देखील या स्पर्धेत वैयक्तिक गटातून खेळणार आहे. तीन वेळा मिस्टर आशिया खिताब पटकावलेला बॉबी सिंग, मिस्टर वर्ल्ड स्पर्धेत सुवर्ण पदक महेंद्र चव्हाण आणि अक्षय मोगरकर, सागर जाधव यांच्यासारख्या इतर नामांकित खेळाडू असणार आहे. विशेष म्हणजे मिश्र आणि तालबध्द जोडी हे गट देखील असणार आहे. मिश्र गटात पुरुष आणि महिला जोडी असणार आहे तर तालबध्द गटात परुष आणि महिला ही जोडी 90 सेकंदात एका तालात आपले प्रदर्शन करतील. अशा एकूण तीन गटात ही स्पर्धा होणार आहे.



हेही वाचा - 

तळवळकरांच्या क्लासिकल शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी 20 लाखांचे बक्षीस


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा