बीसीसीआयला सुप्रीम कोर्टाचा दणका

  Mumbai
  बीसीसीआयला सुप्रीम कोर्टाचा दणका
  मुंबई  -  

  मुंबई - लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास नकार देणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सुप्रीम कोर्टाने सोमवारी झालेल्या सुनावणीत चांगलाच धक्का दिला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के या दोघांना सुप्रीम कोर्टाने पदावरून हटवले आहे.

  कोर्टाने दिलेल्या आदेशांचे पालन न केल्यामुळे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. यासोबतच सुप्रीम कोर्टासमोर खोटी साक्ष दिल्याप्रकरणी कारवाई का केली जाऊ नये? अशी कारणे दाखवा नोटीस ठाकूर आणि शिर्के यांना दिली आहे. १८ जुलै रोजी कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार बीसीसीआयचे पदाधिकारी नियमानुसार अपात्र ठरले होते. लोढा समितीने बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना हटविण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. त्यानंतर झालेल्या सुनावण्यांच्या मालिकेनंतर लोढा समितीने १४ नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टात याप्रकरणी आपला तिसरा अहवाल सादर केला होता. लोढा समितीच्या ठाम भूमिकेनंतर सुप्रीम कोर्टानेही आपला आदेश कायम ठेवत बीसीसीआयला शिफारशी लागू करण्याचे आदेश दिले होते. पण, कोर्टाच्या वारंवार सुचनेनंतरही बीसीसीआयने लोढा समितीच्या शिफारशी मान्य करण्यास नकार दर्शवला. बीसीसीआयच्या नव्या पदाधिकाऱ्यांसाठी नाव सुचविण्यासाठी कोर्टाने फली नरीमन आणि गोपाल सुब्रमण्यम या न्यायमित्रांची (अमायकस क्युरी) नेमणूक केली आहे. पुढील सुनावणी १९ जानेवारी रोजी होणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.