सुप्रिमो चषकचा थरार 12 एप्रिलपासून

  Bandra
  सुप्रिमो चषकचा थरार 12 एप्रिलपासून
  मुंबई  -  

  सुप्रिमो चषक टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट आजपासुन कलिना इथल्या एअर इंडिया ग्राउंड येथे सुरू होत आहे. 

  दरवर्षी मोठ्या उत्साहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त 2010 मध्ये प्रथम या स्पर्धेचे आयोजन अनिल परब यांनी केले होते. या स्पर्धेत एकूण 16 संघाचा समावेश आहे. भारतातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. या स्पर्धेतल्या विजेत्या संघाला करंडक आणि 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. सोबतच सामनावीरला मारुती कार अशा स्वरूपाचे पारितोषिक असणार आहे.

  यामध्ये मुंबईसह नवी मुंबई, पालघर, पुणे, नागपूर, गुजरात, कोलकाता, छत्तीसगड इथल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.