Advertisement

'या' जलपरीने मोडला स्वत:चाच विक्रम, खारदांडा ते गेटवे अंतर पार


'या' जलपरीने मोडला स्वत:चाच विक्रम, खारदांडा ते गेटवे अंतर पार
SHARES

मंगळवारी पहाटे मुंबईकर गाढ झोपेत असताना शहरात एक अनोखा विक्रम घडला. राजस्थानच्या उदयपूरमधील १४ वर्षीय जलतरणपटू गौरी सिंघवी हिने थंडगार लाटांशी स्पर्धा करत खारदांडा ते गेट वे आॅफ इंडिया असं ४८ किमीचं अंतर ९ तासांत पार करत स्वत:चाच विक्रम मोडीत काढला.

गौरी सिंघवी मुंबईच्या समुद्रात सलग ४८ तास पोहली. यापूर्वी अशी कामगिरी कुणीच केली नव्हती. महत्त्वाचं म्हणजे तिने हा विक्रम करण्यासाठी उदरपूरहून थेट मुंबई गाठलं. याआधी गौरीने मार्च २०१७ रोजी सी लिंक ते गेट वे आॅफ इंडिया असं ३६ किमीचं अंतर पोहून पार केलं होतं.

या पराक्रमानंतर आत्मविश्वास वाढल्यानंतर तिनं खारदांडा ते गेट वे आॅफ इंडिया हे लक्ष्य समोर ठेवलं. त्यासाठी खडतर सराव केला आणि मुंबईच्या समुद्रात झेप घेतली. मंगळवारी पहाटे मुंबईकर साखरझोपेत असताना गौरीने ४८ किमीचं अंतर पार करत विक्रम रचला.

एवढ्यावरच न थांबता गौरीला इंग्लिश खाडी पोहून विक्रमाला गवसणी घालण्याचं स्वप्न आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा